नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका माजी मंत्र्याचे लवकरच मंत्रिमंडळात कॅमबॅक होणार आहे. पक्षातील एका माजी मंत्र्याने आणि एका वरिष्ठ मंत्र्याने नुकतेच दिल्लीत महायुतीतील श्रेष्ठींची भेट घेतली. रविवारी रात्री दिल्लीत ही भेट झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने संबंधित मंत्र्यांच्या पुनरागमनाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्या माजी मंत्र्याने दिल्लीत भाजप श्रेष्ठींची जाऊन भेट घेतली. संबंधित माजी मंत्र्यांसाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी गुरुवारी रात्री वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. भेटीत आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात राष्ट्रवादीच्या संबंधित नेत्याला सुनेत्रा पवारांकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे.
मंत्र्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी
सुनेत्रा पवार यांनी देखील संबंधित विषयाबाबत यापूर्वीच अमित शाह यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत चर्चा पार पडली होती. गुरुवारी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, धनंजय मुंडे यांची भेट झाली होती. आज पुन्हा सायंकाळी ४ वाजता कोअर कमिटीची बैठक देवगिरी निवासस्थानी होणार आहे. ज्या माजी मंत्र्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होईल. या सदर मंत्र्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांनी आधीही घेतली होती अमित शाह यांची भेट
मागील महिन्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्रिमंडळ बदलाच्या हालचालींची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक पार पडली होती. या बैठकीत राज्यातील राष्ट्रवादीच्या वाट्याचे अर्थखात मिळण्यासोबतच मंत्रिपदे बदलण्याची देखील राष्ट्रवादीच्या प्रमुखांकडून अमित शाहांकडे इच्छा व्यक्त करण्यात आली होती. अमित शाह यांच्या भेटीनंतर लगेचच राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतही अमित शाह यांनी चर्चा केली होती. दरम्यान राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या अमित शहा यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडणार्या घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान पक्षामध्ये अंतर्गत बदल होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे, गेल्या काही दिवसांमध्ये पार्थ पवार यांनी पक्षाची कमान हाती घेतली आहे, त्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय ते घेत आहेत, त्यामध्ये हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतात सांगितले जात आहे.
ना सुनेत्रा पवार, ना पार्थ पवार ...!!
विधान परिषदेच्या निवडणुकीत अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीला प्रचंड अपयश आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. हे चित्र असतानाच राष्ट्रवादीच्या बड्या आणि अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपचे नेते अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीवेळी उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित नव्हते. या दोघांना वगळून ही भेट झाली आहे. भेटीचा फोटोही व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यात येत्या काळात काही राजकीय घडामोडी घडणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.